मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा...
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा... 
नवी मुंबई / पनवेल वैभव  - : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन २०२६ निमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल, नवी मुंबई येथे परिचारिकांच्या रुग्णसेवेतील योगदानाचा गौरव करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमच्या परिचारिका, आमचे भविष्य; सशक्त परिचारिका एखाद्याचा अमूल्य जीव वाचवतात (Our Nurses. Our Future. Empowered Nurses Save Lives) या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात परिचारिकांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. संदिप जोशी(केंद्र प्रमुख, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) ,नीरज लाल(मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे महाराष्ट्र आणि कर्नाटक विभागाचे प्रादेशिक संचालक) यांच्या नेतृत्वाखाली हा यशस्वी उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी परिचारिकांना वैयक्तिक शुभेच्छापत्रे, गुलाबपुष्प, चॉकलेट्स, भेटवस्तू आणि त्यांनी केलेल्या दिर्घकाळ सेवेसाठी त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, नृत्य, खेळ आणि टीम-बिल्डिंग उपक्रमांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी रुग्णांच्या कठीण काळात परिचारिका केवळ वैद्यकीय सेवा नव्हे तर मानसिक आधार आणि दिलासाही देतात, असे मत रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केले. परिचारिकांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन आणि योग्य तो सन्मान मिळावा, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमामुळे परिचारिकांमध्ये आनंद, आपलेपणा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
Comments