जी.एन.एम नर्सिंग विद्यार्थिनींचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न...
जी.एन.एम नर्सिंग विद्यार्थिनींचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न...


पनवेल / प्रतिनिधी  : - तळोजा येथील बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जी.एन.एम नर्सिंगच्या पहिल्या वर्षाच्या मार्च २०२६ परीक्षेत यश संपादन केलेल्या टॉप ५ गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी भूषविले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सौरभ खेडेकर, उपप्राचार्या प्राची गाडे, वरिष्ठ ट्यूटर त्रिवेणी बुटकर तसेच कॉलेज समुपदेशक रशना मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाला पहिल्या व दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

जी.एन.एम च्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचा गौरव वाढविला. यामध्ये निमिषा चलाऊ हिने ७५.६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. कांचन देवडे (७४.८ टक्के) द्वितीय, भक्ती साईल (७३.० टक्के) तृतीय, बागुल पुष्पा (७०.८ टक्के) चतुर्थ तर यादव आकांक्षा (६८.० टक्के) पंचम क्रमांक पटकाविला.

यशस्वी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी विद्यार्थिनींनी भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करत समाजसेवेत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय व्यवस्थापन व प्राध्यापकवर्गाने केले होते. उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image