प्रामाणिकपणाचा आदर्श ; वाल्मिकी समाजातील अन्नु पारचे हिचा गौरव ...
प्रामाणिकपणाचा आदर्श ; वाल्मिकी समाजातील अन्नु पारचे हिचा गौरव ...
पनवेल / प्रतिनिधी  -  : प्रभाग क्र. १८ मधील वाल्मिकी नगर येथे राहणाऱ्या व वाल्मिकी समाजातील अन्नु अशोक पारचे हिने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाऊसकीपिंगचे काम करत असताना त्यांना रोख रक्कम व सुमारे २ लाख रुपयांचा चेक सापडला. कोणताही मोह न बाळगता त्यांनी तो चेक तात्काळ आपल्या वरिष्ठांकडे सुपूर्द केला.
त्यांच्या या प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ व मूल्याधिष्ठित वर्तनाची दखल घेत संबंधित संस्थेकडून त्यांना सुपरवायझर पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल पनवेल महापालिकेचे महापौर  नितीन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोबत नगरसेवक दशरथ म्हात्रे उपस्थित होते.
अन्नु पारचे यांच्या या कृतीमुळे वाल्मिकी समाजाचा प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा आणि सामाजिक बांधिलकी जपणारी परंपरा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Comments