नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
 
नवी मुंबई / पनवेल वैभव - : वाढत्या ॲलर्जीच्या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून न्यूईरा हॉस्पिटलने नवी मुंबईत अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू केले आहे. या क्लिनिकअंतर्गत रुग्णांसाठी एक विशेष ‘ॲलर्जी पॅकेज’तयार करण्यात आले असून,यातंर्गत एकाच पॅनेलमध्ये तब्बल १५० ॲलर्जन्सची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे कमी खर्चात अचूक निदान आणि प्रभावी उपचार व्यवस्थापन शक्य होणार आहे.

ॲलर्जीची लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते किंवा त्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार केले जातात ज्यामुळे रुग्णांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेले हे क्लिनिक अन्न, पर्यावरण आणि जीवनशैलीशी संबंधित विविध प्रकारच्या ॲलर्जींचे अचूक निदान करण्यास मदत करणार आहे. यामुळे रुग्णांना त्यांच्या ॲलर्जीचे मूळ कारण (ट्रिगर्स) ओळखता येईल आणि त्यानुसार वैयक्तिक उपचार योजना आखता येतील.

 या क्लिनिकचे उद्घाटन  डॉ. अमिश वाखलू (ईएनटी आणि हेड ॲण्ड नेक सर्जन), डॉ. चंद्रशेखर टी. (क्रिटिकल केअर मेडिसिन), डॉ. निशांत तावडे (इंटरनल मेडिसिन) आणि डॉ. मनीष पेंडसे (फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सुनील कुट्टी (संस्थापक संचालक - ब्रेन आणि स्पाइन सर्जरी) आणि डॉ. माताप्रसाद गुप्ता (उपाध्यक्ष आणि सीईओ) यांची प्रमुख उपस्थिती होती.

 डॉ. अमिश वाखलू (ईएनटी आणि हेड ॲण्ड नेक सर्जन) सांगतात की, अनेकदा ॲलर्जीकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे वारंवार लक्षणं जाणवू लागतात आणि अस्वस्थता निर्माण होते. या क्लिनिकमुळे अन्न, श्वसनमार्गासंबंधी ॲलर्जी (जसे की धूळ, परागकण आणि पाळीव प्राण्यांचे केस) आणि त्वचेशी संबंधित ॲलर्जींचे अचूक निदान करता येणार आहे. एकाच पॅनेलमध्ये विविध तपासण्या उपलब्ध असल्याने वेळ वाचेल आणि अचूक उपचार घेणे शक्य होईल.

 डॉ. माताप्रसाद गुप्ता (उपाध्यक्ष आणि सीईओ) यांनी सांगितले की, रुग्णांना अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा देण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे. या ॲलर्जी क्लिनिकमुळे रुग्णांना वेळीच निदान, योग्य उपचार आणि उत्तम आरोग्य मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल.

न्यूईरा हॉस्पिटलचा हा उपक्रम प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेकडे टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, ॲलर्जीच्या वाढत्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तो उपयुक्त ठरणार आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image