२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
२४ तासाचे आत घरफोडीचे ०३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत


पनवेल वैभव /  दि.१३ (संजय कदम) : कळंबोलीमध्ये घराच्या मुख्य लाकडी दरवाज्याचे लॅच तोडून सुमारे ३० तोळे वजनाचे सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ३६ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरणाऱ्या त्रिकुटाला २४ तासाचे आत गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने अटक केली आहे.    

फिर्यादी रूबी पात्रो यांचे कळंबोली येथील राहते घरी अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य लाकडी दरवाज्याचे लॅच तोडून सुमारे ३० तोळे वजनाचे सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ३६ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी केल्याची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष २ चे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देवुन गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासावरून आरोपी पवन जाधव (वय २५, रा.डायघर), सुमित जाधव (वय २२, रा.पडले) आणि शिवाजी राठोड (वय २३, रा.पडले) यांना डायघर गांव येथे सापळा रचून शिताफीने ताब्यात घेवून अटक केले. गुन्हयाचे तपासादरम्यान अटक आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेलेले सुमारे ३० ग्रॅम वजनाचे ३६ लाख किंमतीचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सपोनि एकनाथ देसाई, पोउपनि संजय पवार, पोउपनि अभिजीत देशमुख, पोहवा दुधाळ, पोहवा जोशी, पोहवा जेजुरकर, पोहवा पांचाळ, पोहवा सावंत, पोहवा राउत, पोहवा पाटील, पोहवा धनवटे, पोहवा कोपरकर, पोना मोरे, पोना गायकवाड, चापोना कोळी, पोशि तांदळे व चापोना सोनवलकर यांनी केली आहे.
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न ...
Image