मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी-मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार
दीर्घकालीन पाठदुखी, स्लिप डिस्क, मानेच्या वेदना व पोश्चर समस्यांसाठी प्रगत निदान, वैयक्तिक उपचार योजना आणि मिनिमली इनवेसिव्ह सर्जरीची सुविधा
नवी मुंबई,/ पनवेल वैभव (दि १३) : -
बैठी जीवनशैली, दीर्घकाळ लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर सुरु असलेले काम, चुकीची शारीरीक स्थिती आणि वाढता स्क्रीन टाइम यामुळे मणक्याशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहे. हे लक्षात घेता खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये नुकतेच कॉम्प्रिहेन्सिव्ह स्पाइन क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. पाठदुखी, स्लिप डिस्क, मानेचे दुखणे, शारीरीक स्थिती संबंधित विकार आणि हालचालींमध्ये अडथळे येणाऱ्या रुग्णांसाठी तज्ञांकडून तपासणी, प्रगत निदान आणि वैयक्तिक उपचार योजना आखणे हे या क्लिनिकचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हल्ली आधुनिक जीवनशैलीमुळे दीर्घकाळ बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, चुकीची शारीरीक स्थिती आणि वाढते वय यामुळे मणक्याच्या समस्या लहान वयातही दिसून येऊ लागल्या आहेत. अनेकांना सतत पाठदुखी, मान कडक होणे, हात-पाय सुन्न पडणे, मुंग्या येणे किंवा दैनंदिन कामे करताना त्रास जाणवतो. वेळीच उपचार न घेतल्यास मज्जातंतूंवर दाब येतो, हालचाल मंदावते, पाठीचा कण्याचे विकारांमध्ये वाढ होते आणि दीर्घकालीन अपंगत्वाचा धोका निर्माण होऊ शकतो.
स्पाइन क्लिनिकमध्ये सखोल वैद्यकीय तपासणी आणि प्रगत निदान चाचण्यांद्वारे वेदनेचे मूळ कारण शोधून काढले जाते. त्यानुसार औषधोपचार, फिजिओथेरपी, शारीरीक स्थिती सुधारणे, जीवनशैलीत बदल, वेदना व्यवस्थापन तसेच आवश्यक असल्यास प्रगत शस्त्रक्रियेद्वारे उपचार पुरविले जातात.
*ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक डॉ. प्रमोद भोर सांगतात की,* बैठी जीवनशैली, चुकीची शारीरीक स्थिती आणि व्यायामाचा अभाव यामुळे सर्वच वयोगटात मणक्याच्या समस्या वाढत आहेत. सुरुवातीला पाठदुखी, कडकपणा किंवा मुंग्या येणे यासारखी लक्षणे दुर्लक्षित केली जातात आणि नंतर ही समस्या गंभीर होते. या स्पाइन क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही वेळीच निदान, वैयक्तिकृत उपचार आणि प्रतिबंधात्मक काळजी यावर विशेष भर देत आहोत, जेणेकरून रुग्णांना वेदनांवर प्रभावी नियंत्रण मिळवून जीवनाचा दर्जा सुधारता येईल.
या क्लिनिकमध्ये दीर्घकालीन पाठदुखी, मानदुखी, स्लिप डिस्क, डिजनरेटिव्ह स्पाइन डिसऑर्डर, स्कोलियोसिस, मेटास्टॅटिक स्पाइन कॉम्प्रेशन, फ्रॅक्चर आणि इतर मणक्याच्या विकारांवर बहुविद्याशाखीय पद्धतीने उपचार केले जातात. ऑर्थोपेडिक तज्ञ, स्पाइन सर्जन, फिजिओथेरपिस्ट आणि पुनर्वसन तज्ञ यांची संयुक्त टीम रुग्णांसाठी उपचार योजना तयार करते. तसेच एंडोस्कोपिक आणि मिनिमली इनवेसिव्ह स्पाइन सर्जरीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलद पुनर्प्राप्तीवर भर दिला जातो.
ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन डॉ. अरविंद वाटकर म्हणाले,
मणक्याचे अनेक आजार वेळीच ओळखले तर शस्त्रक्रियेविना ते नियंत्रणात आणता येतात. अनेक रुग्ण वेदनाशामक औषधांवर अवलंबून राहतात, परंतु मूळ कारण शोधणे गरजेचे आहे . योग्य निदान, प्रभावी फिजिओथेरपी, योग्य शारीरीक स्थिती बाळगण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि जीवनशैलीत योग्य बदल करणे यावर आम्ही भर देतो. केवळ वेदना कमी करणे नाही तर मणक्याचे स्नायु बळकट करणे आणि रुग्णांना सुरक्षितपणे दैनंदिन जीवनात परत आणणे हे आमचे ध्येय आहे. मणक्याशी संबंधित समस्यांकरिता उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
संदीप जोशी (केंद्र प्रमुख- मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) म्हणाले, मणक्याच्या विकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखालील विशेष उपचार करणे गरजेचे आहे. या स्पाइन क्लिनिकद्वारे आम्ही रुग्णांना अचुक, प्रगत आणि सर्वसमावेशक उपचार पुरवतो, जेणेकरून ते निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकतात.