उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना मोफत स्कॉलरशिपच्या पुस्तकांचे वाटप..
शिवसेनेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना मोफत स्कॉलरशिप पुस्तकांचे वाटप..

शिवसेना महानगर समन्वयक राहुल गोगटे यांचा पुढाकार
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल मधील महानगरपालिका दगडी शाळा येथे ४ थी व  ७ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत स्कॉलरशीपच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

मनपा शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सक्षमते अभावी इतर परीक्षा देताना अडचणी निर्माण होतात त्यामुळे ते परीक्षा देऊ शकत नाहीत,त्यांना स्कॉलरशीप सारख्या परीक्षा देताना आवश्यक ती पुस्तके मिळाल्यास विद्यार्थी चांगला अभ्यास करून स्कॉलरशीप परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. ही विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले.याबद्दल शाळेतील शिक्षक वर्गाने सदर उपक्रमाबद्दल आभार मानले. यावेळी बोलताना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी सांगितले की भविष्यात कधीही शालेय पुस्तकांची आवशक्यता लागल्यास ती त्वरित देण्याचे काम शिवसेना करेल.

यावेळी महानगरप्रमुख प्रथमेश सोमण,शहरप्रमुख प्रसाद सोनवणे,उपशहर प्रमुख शैलेश जगनाडे, संघटक अभिजित साखरे,सुजन मुसलोंडकर,मंदार पाटणकर, विक्रम पाटणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image