नवी मुंबईत पहिल्यांदाच पुरुषांसाठी अँड्रॉलॉजी क्लिनिक; मेडिकव्हर हॉस्पिटलचा पुढाकार...
नवी मुंबईत पहिल्यांदाच पुरुषांसाठी अँड्रॉलॉजी क्लिनिक; मेडिकव्हर हॉस्पिटलचा पुढाकार...

तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक मायक्रोसर्जरी,प्रजनन उपचार व जेंडर चेंज शस्त्रक्रियेचा घेता येणार लाभ...
 नवी मुंबई: (पनवेल वैभव)
मेडिकव्हर हॉस्पिटल्सने पुरुषांच्या प्रजनन आणि लैंगिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी नुकतेच अँड्रोलॉजी युनिट सुरू केले आहे. या विभागातंर्गत एकाच छताखाली वैद्यकीय सल्ला, आधुनिक उपचार आणि प्रगत मायक्रोसर्जिकल सुविधा पुरविली जाणार आहे. डॉ. सनीश श्रृंगारपुरे(युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट) आणि डॉ. विकास भिसे(युरोलॉजिस्ट) यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचे कामकाज सुरु राहील. 

अँड्रोलॉजी ही युरोलॉजीची एक विशेष शाखा आहे जी पुरुषांचे प्रजनन आरोग्य, प्रजनन क्षमता, लैंगिक कार्य, संप्रेरक पातळी आणि  लैंगिक विकृतींवर परिणाम करणाऱ्या परिस्थितींवर लक्ष केंद्रित करते. अनेक पुरुष लज्जेखातर किंवा जागरूकतेच्या अभावामुळे वेळीच उपचार घेण्यास विलंब करतात हे ओळखून, रुग्णालयाने पुरुष वंध्यत्व, इरेक्टाइल डिसफंक्शन, अकाली वीर्यपतन, व्हॅरिकोसेल, टेस्टोस्टेरॉनची कमतरता (हायपोगोनॅडिझम),पेरोनी रोग, अझूस्पर्मिया आणि टेस्टिक्युलर किंवा पेनाइल असामान्यता यासाठी व्यापक स्वरुपात निदान आणि उपचार पुरविण्यासाठी एक एंड्रोलॉजी युनिट सुरू केले आहे.

या युनिटमध्ये उपलब्ध प्रगत प्रक्रियांमध्ये मायक्रोसर्जिकल व्हॅरिकोसेलेक्टॉमी, इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी पेनाइल प्रोस्थेसिस इम्प्लांटेशन, आयव्हीएफ किंवा आयसीएसआयसाठी टेस्टिक्युलर बायोप्सी आणि शुक्राणू काढण्याची विशेष तंत्राचा वापर , हायपोगोनॅडिझमसाठी हार्मोनल थेरपी, लिंगाची वक्रता सुधारण्यासाठी शस्त्रक्रिया, इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी पीआरपी आणि शॉकवेव्ह थेरपी, पेनाइल लेन्थनिंग सर्जरी आणि लिंग बदल शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

 डॉ. सनीश श्रृंगारपुरे सांगतात की, बरेचसे पुरुष हे त्यांच्या लैंगिक आणि प्रजनन आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि जागरूकतेच्या अभावामुळे बऱ्याचदा उपचारास विलंब होतो. वंध्यत्व, लिंगाच्या कार्यात अडथळा आणि हार्मोनल असंतुलन यासारख्या परिस्थितींना योग्य निदान आणि उपचारांची आवश्यकता असते. वैद्यकीय देखरेखीखाली लिंगाचा आकार वाढवण्याच्या प्रक्रियांचा शोध घेणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि या क्लिनिकच्या माध्यमातून तज्ञांच्या देखरेखीखाली सुरक्षित उपचार पुरवले जाणार आहेत.

 डॉ. विकास भिसे सांगतात की, मूत्रपिंडातील खडे, प्रोस्टेटची वाढ आणि मूत्रमार्गातील संसर्ग यासारख्या सामान्य मूत्रविकारांचे प्रमाण वाढत आहे. लिंगाचे बिघडलेले कार्य आणि वंध्यत्वाच्या अनेक प्रकरणांमध्ये व्हॅरिकोसेल किंवा अझोस्पर्मिया सारखे विकार कारणीभूत ठरतात. वेळीच उपचार इरेक्टाईल डिसफंक्शन किंवा वंध्यत्व प्रभावीपणे व्यवस्थापित केले जाऊ शकते.

पुरुषांच्या प्रजनन तसेच लैंगिक आरोग्याविषयीच्या
समस्या सोडवून त्याबाबत लाज न बाळगता तज्ज्ञांशी खुलेपणाने चर्चा करण्यासाठी या विभागाची सुरुवात करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे केंद्र प्रमुख संदीप जोशी यांनी व्यक्त केली.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image