पनवेल तालुका पोलिसांच्या धडक कारवाईत जवळपास सव्वा लाख रुपये किमतीचा बेकायदेशीररित्या साठा केलेला गुटखा हस्तगत..
पनवेल तालुका पोलिसांच्या धडक कारवाईत जवळपास सव्वा लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर रित्या साठा केलेला गुटखा हस्तगत 

पनवेल वैभव / दि.२०(संजय कदम):  पनवेल तालुक्यातील आजिवली गाव परिसरात एका किराणा विक्री करणाऱ्या दुकानात व गोदमात पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात जवळपास सव्वा लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा हस्तगत केला असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 
         तालुक्यातील आजिवली गाव येथील एका किराणा दुकानात तसेच गोदामात बेकायदेशीररित्या गुटख्याचा साठा करून त्याची विक्री करणारा आरोपी रामसौदागर सहदेव भगत, (वय ६५ ) हा करत असल्याची गोपनीय माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिरुद्ध गिजे, पो उपनि हर्षल राजपूत, दीपक शेळके, पोहवा देवरे, धुमाळ, कुदळे, तांडेल, बाबर, म्हारसे, पवार, मपोहवा रोडगे, पोहवा पाटील,  सोशी भगत आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्यांच्या कडून जवळपास सव्वा लाख रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा केशर युक्त विमल पान मसाला  हस्तगत केला असून त्यांच्या विरुद्ध ४३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७५, १२३. २२३ सह अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम ३(१) (२२) (३१)(२२)(V) २६(२)(१), २६(२)(V) २७(३) (३) सह अन्न सुरक्षा मानदे अधिनियम २०११ ये कलम ५९(ii) भा.द.वि कलम २७३, ३२८, १८८ अन्व्ये कारवाई केली आहे. 



फोटो: गुटखा
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image