पंतप्रधान मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ ; मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये भारतनिर्मित ‘मायक्लिप’द्वारे अत्यंत जोखमीच्या हृदयरुग्णावर शस्त्रक्रियेविना यशस्वी उपचार..
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये भारतनिर्मित ‘मायक्लिप’द्वारे अत्यंत जोखमीच्या हृदयरुग्णावर शस्त्रक्रियेविना यशस्वी उपचार

ओपन-हार्ट शस्त्रक्रियेविना वाचविले रुग्णाचे प्राण ; मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईतील पहिली मायक्लिप प्रक्रिया यशस्वी 
नवी मुंबई / पनवेल वैभव : -  
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल येथे पहिल्यांदाच मायक्लिप ही अत्याधुनिक हृदय उपचार प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. या उपचारामुळे अत्यंत धोकादायक स्थितीत असलेल्या एका हृदय रुग्णाचे प्राण वाचले आणि ओपन-हार्ट शस्त्रक्रिया टाळणे शक्य झाले.

एका ५५ वर्षीय रुग्णाला काही दिवसांपासूनच छातीत वेदना होणे आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू  लागला होता. तपासणीत त्यांच्या हृदयाच्या झडपेत (मिट्रल वाल्व) मोठ्या प्रमाणात गुंतागुंत असल्याचे आढळले. तसेच हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता खूपच कमी झाली होती. याआधी २०१९ मध्ये त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली झाल्याने पुन्हा ओपन-हार्ट सर्जरी करणे अतिशय धोकादायक होते.

या गंभीर परिस्थितीत मेडिकव्हर हॉस्पिटलच्या हृदयतज्ज्ञांच्या टीमने शस्त्रक्रियेऐवजी कॅथेटरद्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला. प्रथम हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर मायक्लिप प्रक्रियेच्या मदतीने हृदयाची झडप बंद करण्यात आली. यासाठी दोन मायक्लिप्स बसवण्यात आल्या.

ही प्रक्रिया सुमारे दोन तासांत पूर्ण झाली. उपचारानंतर रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. एका महिन्याच्या तपासणीत हृदयाची कार्यक्षमता २५ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे आढळून आले. कोणतीही गुंतागुंत न होता रुग्णाला दुसऱ्याच दिवशी घरी सोडण्यात आले.

 *ही प्रक्रिया करणारे वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अनुप महाजनी म्हणाले की,* अशा उच्च-जोखमीच्या रुग्णांसाठी मायक्लिपसारखे उपचार वरदान ठरत आहेत. या प्रकरणात वेळीच उपचार मिळाल्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य झाले.

आपली भावना व्यक्त करताना रुग्ण म्हणाले, पुन्हा ओपन-हार्ट शस्त्रक्रियेची कल्पना करुनच मी घाबरुन गेलो होतो. मात्र डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत शस्त्रक्रियेविना सुरक्षित उपचार केले आणि मला नवे आयु्ष्य मिळवून दिले *त्यामुळे मी डॉक्टरांच्या टीमचे मनापासून आभार मानतो*

 *नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे केंद्र प्रमुख संदीप जोशी म्हणाले,* ही प्रक्रिया नवी मुंबईत अत्याधुनिक आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या हृदयविकार उपचारांमधील तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे उत्तम उदाहरण ठरते. मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, आधुनिक उपचार पध्दती आणि रुग्णांकरिता आवश्यक सर्व सुविधा यांच्या माध्यमातून रुग्णांना सर्वोत्तम व रुग्ण-केंद्रित सेवा देण्यावर भर दिला जातो. उच्च जोखमीच्या हृदय रुग्णांनाही सुरक्षित उपचार, लवकर बरे होण्याची संधी तसेच निरोगी भविष्याची भेट देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image