स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या पनवेल शहर अध्यक्षपदी प्रशांत सोनवणे यांची निवड...
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या पनवेल शहर अध्यक्षपदी प्रशांत सोनवणे यांची निवड

पनवेल वैभव /  दि  २४ ( संजय कदम ) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या पनवेल शहर अध्यक्षपदी प्रशांत सोनवणे यांची निवड करण्यात आली असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे . 
                     स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रशांत सोनवणे यांची पनवेल शहर अध्यक्षपदी निवड केली आहे व तशा प्रकारचे नियुक्तीपत्र त्यांनी प्रशांत सोनवणे यांना दिलेले आहे व त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.
फोटो - पनवेल शहर अध्यक्षपदी प्रशांत सोनवणे यांची निवड
Comments