माफक किमतीत उत्तम पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध
विमान उड्डाणे सुरु झाल्यावर येथील दरही गगनभरारी घेतील त्यामुळे येथे घरे घेण्याची हीच योग्य संधी
पनवेल/प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लागत एक नवे सोयीसुविधांनी युक्त असे शहर निर्माण होत आहे. ते म्हणजे पुष्पक नगर .. जेथून मुंबई अवघ्या ३० मिनिटाच्या अंतरावर आहे. तर या ठिकाणाहून पळस्पे फाटा ज्या ठिकाणाहून पुणे तसेच गोवा महामार्ग जातात त्यामुळे घाटमाथ्यावर तसेच कोकणात जायचे असेल हे ठिकाण अगदी सोयीचे आहे. सध्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विकास होत असून अगदी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध आहेत आणि गुंतवणुकीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे बांधकाम व्यावसायिक आणि हीच बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन श्री रिद्धी सिद्धीचे संचालक अनिल सिंघवी यांनी सांगितले. बहुउद्देशीय सेवा संस्थेतर्फे पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्झीबिशनचे आयोजन करण्यात आले आहे याची माहिती देण्याकरता करंजाडे येथील कालभैरव मंदिरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष सुनील कटेकर , ओम सिव्हिलचे नागेश सुरवसे, संतोष सुतार उपस्थित होते.
यावेळी दिशा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितले कि, भंगारपाडा या गावचे नाव आता श्रीरामनगर झाले असून पुष्पकनगर हे दापोली व श्रीरामनगर या दोन महसुली गावा मध्ये विकसीत होत आहे. नवी मुंबई विमानतळ बाधित प्रकल्प ग्रस्थांना पुष्पक नगर या ठिकाणी विकसित भूखंड देण्यात आले आहेत. हे शहर अगदी नियोजित असून सुद्धा या नगराची ज्या प्रकारे प्रसिद्धी व प्रचार व्हायला हवा होता तो तसा झालेला नाही. आज या ठिकाणी अनेक भूमिपुत्र स्वतःचे प्लॉट डेव्हलप करत आहेत तर काहींनी ते भागीदारी तत्वावर बांधण्यास दिले आहेत. त्यामुळे आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहत आहेत. बांधकाम व्यावसायिक आपल्या परीने आप आपल्या प्रोजेक्टची जाहिरात करतात पण ते पुरेसे होत नाही आणि म्हणूनच पुषक नगर येथील प्रकल्प जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्झीबिशनचे आयोजन करण्यात आले आहे. सदर एक्झीबिशन दि. २२ ते ३१ डिसेम्बर दरम्यान कर्नाळा स्पोर्ट्स येथे होणार आहे. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी भेट देऊन या प्रोजेक्टची माहिती घेऊन आपल्याला आवडते घर बुक करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी ओम सिव्हिलचे नागेश सुरवसे यांनी सांगितले कि पुष्पक नगर मध्ये गुंतवणूक करण्याची खरी हीच वेळ आहे आता नवी मुंबई विमानतळ सुरु होणार आहे आणि हे विमानतळ सुरु झाल्यावर काही दिवसांतच या ठिकाणचे दर वाढणार यात शंका नाही त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. प्रॉपर्टीचे विविध पर्याय एकाच ठिकाणी पाहण्यासाठी या प्रॉपर्टी एक्झीबिशनला ग्राहकांनी जरूर भेट द्यावी तसेच या ठिकाणी बुकिंग करणारांची आकर्षक योजनाही या ठिकाणी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रोटरी क्लबच्या पनवेल महोत्सवात पुष्पक नगर एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्याचे फायदा या प्रॉपर्टी एक्झीबिशनला होणार आहे. या दहा दिवसात जवळपास २ लाख लोकांपर्यंत पुष्पक नगरचे प्रोजेक्ट पोहोचणार आहेत. याचा फायदा पुष्पक नगरला नक्कीच होणार आहे.