आगामी निवडणुकीसंदर्भात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न...
आगामी निवडणुकीसंदर्भात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न...

पनवेल / प्रतिनिधी : -
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक महेश साळुंखे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.  या बैठकीमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.  
या वेळी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी महेश साळुंखे यांना पाठिंबा देण्याबाबतचे सर्व अधिकार दिले.  पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशीही मागणी केलेली आहे की महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी जो पक्ष आपल्या पक्षाला सन्मानाची वागणूक देईल त्याच पक्षाला पाठिंबा देण्यात यावा अन्यथा अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्यात यावा.  
पनवेल महानगरपालिकेच्या 20 वार्डांपैकी 18, 19, 20 या वार्डांमध्ये पक्षाची चांगल्या प्रकारची ताकद आहे आणि ही ताकद उमेदवार निवडून आणण्याकरिता निर्णायक मतदार ठरू शकतात.  त्याचप्रमाणे कामोठे विभाग , खांदा कॉलनी,  नवीन पनवेल , कळंबोली या ठिकाणी सुद्धा पक्षाची चांगल्या प्रकारची ताकद आहे.  जर पक्षाच्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून महेश साळुंखे जो निर्णय घेतील तो पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहणार आहे अशी ग्वाही सर्व कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. 
लवकरच महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा याविषयी दोन्ही गटाच्या वरिष्ठांशी महेश साळुंखे चर्चा करत आहेत आणि लवकरच कोणाला पाठिंबा द्यायचा याविषयी निर्णय साळुंखे जाहीर करतील.  
सदर बैठकीमध्ये खालील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. निलेश कांबळे, अध्यक्ष, पनवेल विधानसभा मतदारसंघ, श्री दिलीप नाईक , अध्यक्ष, पनवेल तालुका . श्री नरेश परदेशी उपाध्यक्ष पनवेल तालुका , श्री मनोज कांबळे अध्यक्ष पनवेल शहर ,श्री किशोर कदम अध्यक्ष नवीन पनवेल विभाग, श्री अरुण जाधव अध्यक्ष कामोठे शहर विभाग ,सौ ममताज पठाण अध्यक्ष महिला आघाडी पनवेल शहर ,श्री भारत दाताड उपाध्यक्ष पनवेल शहर ,
श्री आसिफ शेख अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल पनवेल शहर ,सौ निशा कोळी उपाध्यक्ष महिला आघाडी पनवेल शहर,श्री समाधान कांबळे संघटक पनवेल शहर, श्री अशोक कदम उपाध्यक्ष नवीन पनवेल विभाग , श्री मयूर गायकवाड सरचिटणीस पनवेल शहर,श्री चंद्रकांत वेळासकर संघटक पनवेल तालुका, श्री प्रशांत सोनवणे उपाध्यक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघ, श्री अनिल वामने संघटक पनवेल विधानसभा मतदारसंघ,व महिला आघाडीच्या सुमन पाटील व फातिमा  या उपस्थित होत्या.
Comments