नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरातील फार्म हाऊस गजबजणार
पनवेल दि.२१(वार्ताहर): नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरातील फार्म हाऊस गजबजताना दिसणार असल्याने अनेक फार्महाऊसमध्ये सर्व शासकीय नियमांचे पालन करीत जय्य्त तयारी सुरु असल्याचे दिसत आहे.
यावर्षी वर्ष अखेर ३१ डिसेंबरला असून या दिवशी बुधवार आहे. त्यामुळे विविध परिसरातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर पनवेल परिसरात मोठी गर्दी करणार व आहेत. थर्टी फर्स्टच्या दिवशी बुधवार असल्यामुळे पिणाऱ्यांची मोठी चंगळ होणार आहे. हजारो कोंबड्या, कोंबडे, बकरे यांची , कत्तल होणार आहे. यावर्षी पाऊस जवळजवळ सहा महिने सातत्याने पडत होता. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून वालाच्या शेंगाचा बहर उशिराने येणार आहे. त्या दिवशी पोपटीची चंव फार थोड्या प्रमाणावर मिळणार आहे. गावठी कोंबड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे कोंबडीची किंमत रु ४०० ते ५०० तसेच कोंबड्याची किंमत रु ८०० आणि त्यापुढे आहे. गावठी कोंबडा कोंबडीच्या शोधामध्ये अनेक जण आताच फिरू लागले आहेत.
पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात फार्महाउस असून त्यामध्ये प्रामुख्यांने राज रिसॉर्ट, छाया रिसॉर्ट, एम. जे. रिसॉर्ट, एस, आर रिसॉर्ट, विसावा रिसॉर्ट, रियाण फार्महाउस आदी फार्महाऊसमध्ये दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. या वर्षीसुद्धा मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे परिसरातील नागरिकांनी पनवेल परिसरात असलेल्या फार्महाऊसमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे योजिले असल्याने पूर्वीपासून त्यांनी येथे बुकींग करून ठेवली आहे. फार्महाउस वाल्यांनी सुद्धा सर्वसामान्यांना परवडेल असे दर ठेवले आहेत. त्यामुळे हे फार्महाउस हाऊसफुल्ल झाले आहेत.
कोट:
दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात ग्राहक राज रिसॉर्ट मध्ये येणार असल्याने सर्व शासकीय नियमांचे पालन करून येथे नियोजन करण्यात आल्याने त्यांना एक वेगळा अनुभव यावर्षी सुद्धा नक्कीच मिळेल - मालक संतोष उरणकर
फोटो: राज रिसॉर्ट