पनवेल येथील एमपीएसए बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी केली उत्कृष्ट कामगिरी
पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : पनवेल येथील एमपीएसए बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत पनवेलचे नाव उज्ज्वल केले आहे. क्लबच्या अहाना सोमण, सई कारंडे, नेहा झांजे, सम्राट पाटील, संस्कार सूर्यवंशी, आरव कदम या खेळाडूंनी या स्पर्धेत विजय संपादन केला, तर विहंग याला उपविजेतेपदाचा मान मिळवला.
एमपीएसए बॉक्सिंग क्लबच्या सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत अभूतपूर्व उत्साह आणि दमदार प्रदर्शन दाखवले. खेळाडूंच्या या यशामुळे क्लबचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खेळाडूंच्या या यशामध्ये त्यांचे प्रशिक्षक अद्वैत शेंबवणेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आणि अथक परिश्रमामुळेच क्लबचे खेळाडू हे उत्कृष्ट प्रदर्शन करू शकले, असे मत क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केले. पनवेल शहरासाठी ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
फोटो - बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी केली उत्कृष्ट कामगिरी