नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत १२ वर्षीय अंतरा समीत करांडे हिने पटकावले रौप पदक
पनवेल वैभव / दि.०४(संजय कदम): नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेल मधील महात्मा इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकणारी १२ वर्षीय अंतरा समीत करांडे हिने रौप पदक पटकावले आहे.
कराटे इंडिया ऑर्गनायझेशन तर्फे आयोजित ही स्पर्धा दिल्ली येथील टॉकाटोरा इंडोर स्टेडियम मध्ये झाली. ही स्पर्धा वर्ल्ड कराटे फेडरेशन, एशियन कराटे फेडरेशन, कॉमनवेल्थ कराटे फेडरेशन, साऊथ एशियन कराटे फेडरेशन या प्रतिष्ठित संघटनांशी संलग्न आहे. गेल्या दोन महिन्यात तिने ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक, DSO झोन कराटे चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक, झोन कराटे चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक, वेस्ट झोन कराटे चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक, SGFI (महाराष्ट्र) मध्ये कांस्य पदकपटकविले आहे. यासाठी तिला NBKC कराटे क्लासचे अध्यक्ष आणि प्रशिक्षक रोहन यादव यांचे महत्वाचे मार्गदर्शन लागले आहे. तिच्या या यश बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो: अंतरा समीत करांडे