ऑनलाईन गेमिंगद्वारे सायबर फसवणुक करणा-या १२ गुन्हेगारांच्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेने केले गजाआड ...
ऑनलाईन गेमिंगद्वारे सायबर फसवणुक करणा-या १२ गुन्हेगारांच्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेने केले गजाआड ...


पनवेल दि.०६(वार्ताहर):  राज्यात सर्वत्र राष्ट्रीय सायबर सुरक्षा सप्ताह सुरु असून याच सप्ताहात प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंग द्वारे फसवणूक करणारी टोळी नवी मुंबई पोलिसांनी उध्वस्त केली आहे. टोळीतील १२ जणांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींनी देशभरातील विविध बँकेच्या ८८६ खात्यांचा वापर केल्याचे निष्पन झाले आहे. शिवाय त्यांच्या विरोधात भारतातील एन.सी.सी.आर.पी. पोर्टलच्या एकुण ३९३ तकारी उघड झाले आहे. आरोपींनी आता पर्यंत ८३ कोटी ९७ लाख ४८ हजार २७८ रूपयांची फसवणुक झाल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले आहे.  
         इसाण उस्मानी मिनहाज शेख, हितेश पुनाराम देवांगन, सुनिल श्रवण देवांगन, तोमेशकुमार मोहीत उईके, राहुल राजु देवांगण,अंकीत रमेश सिंग, अभिषेक संजय सिंग, हरिषकुमार मदनलाल अर्पित संतेन्द्रकुमार सोनवाणी, रजत दिलीप शर्मा,लालबाबु राजेश्वर राम कुमार, कृष्णाअंशु अमित विश्वास, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.अवैध्यरित्या गेमिंग अॅप चालविणाऱ्या आरोपींना बँक खाती पुरवणारा आरोपी इसम इम्रान शेख हा सीबीडी रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राहुल पवार यांना मिळाली होती. त्यांनी आरोपी इम्रान उस्मानी मिनहाज शेख (वय.२२, रा. नेरूळ) याला सीबीडी रेल्वे स्टेशन येथुन ताब्यात घेतले. त्याच्या कडे चौकशी केल्यानंतर ऑनलाईन गेमिंग फसवणूक केल्याचे कबूल केल्यावर त्याच्या विरोधात सीबीडी बेलापूर पोलीस ठाणे येथे १४ ऑक्टोबरला गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी इम्रान उरुमानी मिनहाज शेख याने शासन मान्यता असणाऱ्या ऑनलाईन गेमिंग करीता बैंक खाते उघडुन दिल्यास काही रक्कम देण्याचे अमिष नवी मुंबई परिसरातील नागरिकांना दिले होते. तसेच आरोपीने नागरिकांना बँक खाते उघडण्यास लावुन बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड, बँक खात्यास लिंक मोबाईल सिम कार्ड, धनादेश पुस्तिका , इत्यादीचे किट स्वत: कडे घेतले होते. हे किट आरोपी हा डोंबीवली येथे पाठवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या ठिकाणी पंच व तज्ञांच्या सहायाने मध्यवर्ती कक्ष पोलीस पथकाने धाड टाकली असता तेथे प्रतिबंधीत गेमींग व सायबर फसवणुकीचे ऑनलाईन प्रकार चालु असल्याचे दिसून आले. तेथील ऑनलाईन फसवणुक करीता असलेल्या साहित्यासह ५ आरोपींना पंचनामा कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे. गुन्हयातील अटक आरोपीकडे केलेल्या कौशल्यपुर्ण अधिक तपासानंतर अशाच प्रकारे ऑनलाईन सायबर फसवणूक व प्रतिबंधीत ऑनलाईन गेमिंग खेळविणारे इतर आरोपीत हे पुणावळे, पिंपरी चिंचवड येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर ठिकाणी देखील पंच व तज्ञांच्या सहायाने पोलीस पथकाने धाड टाकली असता तेथे प्रतिबंधीत गेमींग व सायबर फसवणुकीचे ऑनलाईन प्रकार चालु असल्याचे दिसून आले. तेथील ऑनलाईन फसवणुक करीता असलेल्या साहित्यासह ६ आरोपींना पंचनामा कारवाई करून १६ तारखेला रोजी अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीकडे असणारे लॅपटॉप व मोबाईल यांचा तांत्रिक तपास केला असता 1.www.Ramesh247.com, www.upl9.Pro.com आणि http://www.Reddybook.blue अशा ऑनलाईन प्रतिबंधीत गेमींग वेबसाईड/ऑपलिकेशन व ऑनलाईन सायबर फसवणुकीकरीता त्यांनी विविध बँकांच्या ८८६ खात्यांचा वापर केलेला असल्याचे निष्पन झाले आहे. तसेच देशभरातील एन.सी.सी.आर.पी. पोर्टलवर दाखल ३९३ तकारीमध्ये शेअर मार्केटींग फॉर्ड, जॉब रॅकेटींग, वर्क फॉर्म होम, इत्यादी हेडचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. एन.सी.सी.आर.पी. पोर्टलवरील दाखल तकारीमध्ये नागरीकांची एकुण ८३ कोटी ९७ लाख ४८ हजार २७८ रूपयांची फसवणुक झाल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे,करीत आहेत.अटक संशयित आरोपी कडून ५२ मोबाईल फोन, ०७ लॅपटॉप, ९९ वेगवेगळ्‌या बँकांचे डेबिट कार्ड, ६४ वेगवेगळ्‌या बँकांचे धनादेश पुस्तिका  १ टाटा सफारी कार असे एकुण १८ लाख ,५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हि कामगिरी ही सहाय्यक पोलीस आयुक्त, अजयकुमार लांडगे,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार,सचिन कोकरे, सतिश भोसले, महेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाने, मंगेश वाट, पोलीस हवालदार अनिल यादव, नितीन जगताप, महेश पाटील, संजय राणे, पोलीस नाईक सतिश चव्हाण, निलेश किंद्रे, सचिन टिके, अजय कदम, दिलीप ठाकूर, सोमनाथ काळे, राहुल वाघ, नवनाथ पाटील, ओंकार भालेराव, पुजा वैदय या पथकाने केली आहे.
फोटो: आरोपींसह पोलिसांचे पथक
Comments