बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आरोग्य शिबीर संपन्न...
बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आरोग्य शिबीर संपन्न


पनवेल वैभव / दि.१५ (संजय कदम) : तळोजे येथील बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आरोग्य शिबीर चे आयोजन भारती मेडीकव्हरचे हॉस्पीटल यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. 
यावेळी जगदिश गायकवाड,  हरेश केणी, बबन केणी, नोफील सय्यद, अनिल नाईक, विजय केणी, कैलास घरत, अंकुश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिनगारे, बबनदादा पारील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपीचे प्राचार्य डॉ मनोज अग्निहोत्री, बी. के. पाटील इन्स्टीट्यूट ऑफ फॉर्मसीचे प्राचार्य डॉ. अक्षय मेश्राम, सौ. अर्चना हिवसे,  भारती मेडीकव्हरचे हॉस्पीटलचे डॉ. आनंद श्रीवास्तव, डॉ सुश्मिता पराटे, सचिन श्रीवास्तव आदींसह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. या शिबीराचे यशस्वी आयोजन प्राचार्य सौरभ खेडेकर, प्राची गाडे, रसना नायर यांनी केले. 
फोटो :  बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आरोग्य शिबीर संपन्न
Comments