ओरायन मॉल मध्ये असंभव चे विशेष प्रीमियर ; शहरातील प्रतिष्ठित मंडळींची मोठी उपस्थिती...
ओरायन  मॉल मध्ये असंभव चे विशेष प्रीमियर ; शहरातील प्रतिष्ठित मंडळींची मोठी उपस्थिती...
पनवेल वैभव / दि. २७ ( वार्ताहर ) : पनवेल शहरातील एकमेव मॉल असलेल्या ओरायन मॉल मध्ये असंभव या मराठी चित्रपटाचे विशेष प्रीमियर मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी असंभव चित्रपटाची स्टारकास्टसह पनवेल शहरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.मराठी अभिनेत्यांना पाहण्यासाठी शहरात मोठी गर्दी झाली होती.
                       ओरायन मॉलचे मालक चित्रपटाचे सहनिर्माते मंगेश परुळेकर ,शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक संजय पोतदार हे या चित्रपटाचे सहनिर्माते यावेळी उपस्थित होते.यांच्यासह अभिनेते सचित पाटील,पुष्कर क्षोत्री,मुक्ता बर्वे,नितीन वैद्य,तेजस देसाई,शर्मिष्ठा राऊत आदींसह या प्रीमियरला आ.प्रशांत ठाकुर,आ.विक्रांत पाटील,भाजप नेते बाळासाहेब पाटील,माजी सभागृह नेते परेश ठाकुर,शिंदे सेनेचे नेते चंद्रशेखर सोमण,मा. नगरसेवक अनिल भगत, उद्योजक विजय लोखंडे आदींसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.यावेळी पनवेलकरांसाठी असंभव चित्रपटाचे विशेष शो चे देखील आयोजन करण्यात आले होते.या शोला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.चित्रपटाच्या स्टारकास्टने यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.या चित्रपाटाचा गोवा येथे होणाऱ्या इफ्फि 2025 आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाल्याने देखील उपस्थितांनी चित्रपटाच्या स्टारकास्ट आणि निर्मात्यांचे अभिनंदन केले,
फोटो - असंभव चे विशेष प्रीमियर
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image