पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
पनवेल वैभव / दि.22 (वार्ताहर) ः एका महिलेची हरविलेली बॅग पनवेल वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करून आभार मानले आहेत.
वसुधा ओमकार जगे यांची बॅग खांदा कॉलनी येथे हरवले असता सदर महिला पनवेल वाहतूक शाखा कार्यालय येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना भेटून सदर बाबत समक्ष सांगितले. औदुंबर पाटील यांनी तात्काळ त्यांचे पीटर वाहन चालक केशव निकम व महिला पोलीस कर्मचारी योगिता पाटील यांना सदर बाबत माहिती देऊन सदर बॅग चा शोध घेणे कामी रवाना केले असता श्री निकम व महिला पोलीस योगिता पाटील यांनी सदर बॅगमध्ये असलेले मोबाईलचे लोकेशन काढून नवीन पनवेल कडे जाणार्या गुरुद्वारा जवळ स्कूल व्हॅन चालक यांना सापडले असता त्यांच्याकडून सदर बॅग व त्यामधील मौल्यवान वस्तू अशा त्यांच्या प्रयत्नाने अल्प कालावधीत शोधून काढले. सदर बॅग मिळाल्यानंतर वसुधा ओंकार जगे यांच्या ताब्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांचे मार्गदर्शन खाली पनवेल वाहतूक शाखेचे स्टाफ सह त्यांच्या ताब्यात हरवलेली बॅग दिली पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि कार्यतत्परता अनुकरणीय आहे. त्यांच्या या मदतनिधीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होतो.
फोटो ः बॅग परत देताना पोलीस