महेंद्रशेठ घरत यांनी दिली राजाराम ठाकूर यांना स्कूटर भेट...
महेंद्रशेठ घरत यांनी दिली राजाराम ठाकूर यांना स्कूटर भेट...

पनवेल वैभव / उलवे, ता. १३ :  न्हावा येथील राजाराम बाळाराम ठाकूर यांना महेंद्रशेठ घरत यांनी गुरुवारी (ता.१३) स्कूटर भेट म्हणून दिली. राजाराम ठाकूर हे १९८३ पासूनचे न्हावायार्डमधील महेंद्रशेठ घरत यांचे जुने सहकारी मित्र. महेंद्रशेठ घरत यांनी १९९५ मध्ये राजाराम ठाकूर यांना दोहा कतार, अबुधाबी, दुबई येथे नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली. तेथे त्यांनी दहा वर्षे वेल्डर म्हणून नोकरी केली. त्यानंतर पी अॅण्ड ओमध्ये महेंद्रशेठ घरत यांच्यामुळेच १६ वर्षे नोकरीची संधी मिळाली. तेथून २०२१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून पुन्हा राजाराम ठाकूर हे महेंद्रशेठ घरत यांच्या सेवेत आहेत. सध्या ते शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाजमंदिराचे व्यवस्थापन पाहातात. त्यामुळे सुमारे ४० वर्षांचा सहवास राजाराम ठाकूर आणि महेंद्रशेठ घरत यांचा आहे. ते न्हावा येथून आपल्या जुन्या स्कुटरवरून शेलघर येथे येत असत, हे महेंद्रशेठ घरत यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने गुरुवारी त्यांना नवीकोरी स्कूटर भेट म्हणून दिली. 
यावेळी राजाराम ठाकूर म्हणाले, "महेंद्रशेठ यांना मी ४० वर्षे जवळून बघतोय. माझ्या मते, महेंद्रशेठ घरत हे देवमाणूस आहेत. रोज अनेक लोकांना मदत करताना मी पाहातोय. मला त्यांनी आजपर्यंत काहीच कमी पडू दिले नाही. त्यांच्यामुळेच आज मी सुखी-समाधानी आहे. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आज मला नवीकोरी स्कूटर दिली. आयुष्यभर त्यांचे हे उपकार मी भेडू शकत नाही." 
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "मी मैत्रीला जागतो, राजाराम ठाकूर हे उत्तम सहकारी आहेत. ते कोणत्याही कामाला नाही म्हणत नाहीत. योग्यवेळी त्यांनीही मला उत्तम साथ दिलेली आहे. त्यामुळे अशा सहकाऱ्याचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून त्यांना स्कूटर भेट दिली."
यावेळी 'सुखकर्ता' बंगल्यावर महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते श्रीफल वाढवून स्कूटरचे पूजन करण्यात आले. यावेळी सौ. शुभांगीताई घरत, गुलाबशेठ घरत, नंदराज मुंगाजी आणि काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments