पनवेल शहर पोलिसांकडून वैष्णवी गणेश कडू हिचा विशेष सत्कार ....
पनवेल वैभव / दि.१३ (संजय कदम ) : भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांची कन्या वैष्णवी कडू हिने फ्लोरिडा येथील मायामी एव्हिएशन संस्थेत कमर्शियल पायलटची ट्रेनिंग पूर्ण करून ती कमर्शियल पायलट बनली आहे.
याबद्दल तिचा पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी विशेष सत्कार करून तिचे कौतुक केले . यावेळी पोलीस हवालदार माधव शेवाळे , गणेश कडू , दिलीप देशमुख, हसमुख वनवेरु आदींनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो - वैष्णवी कडू हिचा विशेष सत्कार