विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२५" दिमाखात संपन्न...
पनवेल / प्रतिनिधी : -
रायगड जिल्हा वैश्य समाज संघ शिक्षण समिती व वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2025” हा कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. यावेळी जवळपास 140 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे प्रमुख पुरस्कर्ते मनोज महादेव आंग्रे (विश्वस्त, वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट व रायगड जिल्हा युवक अध्यक्ष) यांनी स्वखर्चाने संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि शिक्षणप्रेमाची ही झलक समाजातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
समाजातील गुणवान विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या सोहळ्याचा मुख्य हेतू होता.
“शिक्षण हीच खरी संपत्ती” या विचाराने प्रेरित हा उपक्रम समाजातील पुढील पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षण सभापती महेश पोटे, संतोष चौधरी, वाणी सर, सुनील भोपतराव, तसेच पनवेल तालुका वैश्य समाज महिला अध्यक्षा वर्षा साखरे व त्यांच्या टीमच्या अथक परिश्रमांमुळे यशस्वीरीत्या पार पडले.

यावेळी डॉ. संतोष कामेरकर, अध्यक्ष, वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रकांत खाडये, सहसचिव, डॉ. अजय चौगुले, हृदयरोग तज्ञ, कृष्णा म्हसकर, निरूपणकार, अशोक भोपतराव, अध्यक्ष, रायगड जिल्हा वैश्य समाज, शामल आंग्रे, महिला अध्यक्ष, रायगड जिल्हा वैश्य समाज, मीरा मनोज आंग्रे, उद्योजिका, सुनील शेटे, अध्यक्ष, पनवेल तालुका वैश्य समाज, तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व उपाध्यक्ष, सचिव, गट सभापती आणि असंख्य समाजबांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट व रायगड जिल्हा वैश्य समाज संघ शिक्षण समिती यांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवर, पाहुणे, आयोजक व स्वयंसेवक यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी मनापासून आनंद व्यक्त केला.