नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल ने केली दुर्मिळ लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया...
३१ वर्षीय महिलेच्या प्लीहामधून निघाला ४ किलो वजनाचा हायडेटिड सिस्ट 
पनवेल वैभव / नवी मुंबई -
डॉक्टरांनी लॅपरोस्कोपिक स्प्लेनेक्टोमी तंत्राचा वापर करून ३१ वर्षीय महिलेच्या प्लीहामधून यशस्वीरित्या हायडेटिड सिस्ट काढून टाकला. या सिस्टच् वजन अंदाजे ४ किलो आणि आकार खरबूजाएवढा मोठा होता. गेल्या १० दिवसांपासून, महिलेला पोटात तीव्र वेदना, पोट फुगणे, उलट्या होणे आणि ओटीपोटात वरच्या बाजूस जडपणा येत होता. तिला एक घासही खाण्यासही  त्रास होत होता. उपचारानंतर, ती आता पूर्णपणे बरी झाली आहे.

रोबोटिक्समधील लॅपरोस्कोपिक अँड लेसर सर्जन डॉ. चिराग वजा, जनरल लॅपरोस्कोपिक अँड रोबोटिक सर्जन डॉ. सारंग बाजपेयी आणि जनरल सर्जन डॉ. नितीन दशरथ तवटे यांच्या टिमने रुग्णावर ही दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया केली. या सिस्टची लांबी ११.२ × १०.५ × ८.६ सेमी इतकी होती.

 रुग्ण रेणुका वर्मा (नाव बदलले आहे) या बऱ्याच दिवसांपासून पोटदुखी आणि उलट्या होत असल्याची तक्रार करत होत्या. तपासणीअंती तिच्या प्लीहामध्ये सुमारे १७ सेमी आकाराचा एक मोठा सिस्ट आढळला. सीटी स्कॅनमध्ये ते हायडेटिड सिस्ट असल्याचे दिसून आले. असे सिस्ट सहसा यकृतामध्ये आढळतात, परंतु या रुग्णामध्ये ते प्लीहामध्ये होते, जे अत्यंत दुर्मिळ आहे.

नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमधील रोबोटिक्स, लॅपरोस्कोपिक आणि लेसर सर्जन डॉ. चिराग वजा सांगतात की, हायडेटिड सिस्ट ही द्रवपदार्थाने भरलेली थैलीसारखी दिसते. हे इचिनोकोकस ग्रॅन्युलोसस नावाच्या परजीवीमुळे होते, जे दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करते. या सिस्टची अनेक वर्षे कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु जर ती मोठी झाली तर त्यामुळे वेदना, संसर्ग किंवा ऍलर्जीक प्रतिक्रिया यासारख्या समस्या उद्भवू शकतात. प्लीहामध्ये असे प्रकार खूप दुर्मिळ आहेत, जे केवळ ०.५% ते ४% इतके आहे.

सिस्ट आकाराने खूप मोठी होती आणि त्यामुळे फुटण्याचा धोका अधिक होता, त्यामुळे शस्त्रक्रिया आवश्यक होती. १४ ऑगस्ट २०२५ रोजी लॅप्रोस्कोपिक स्प्लेनेक्टोमी करण्यात आली. सिस्टने संपूर्ण प्लीहा वेढला गेला होता, त्यामुळे ती काढून टाकावी लागली. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सिस्ट न फोडता प्लीहा काढून टाकण्यात आली.

 डॉ. चिराग वजा यांनी सांगितले की, प्लीहाचे हायडायटिड सिस्ट खूप दुर्मिळ असतात. सहसा अशा प्रकरणांमध्ये ओपन सर्जरी केली जाते, परंतु आम्ही जलद आराम, कमी वेदना आणि जखम कमी करण्यासाठी लॅप्रोस्कोपिक पर्याय निवडला. ४ किलोग्रॅम वजनाची सिस्ट न फुटता काढून टाकणे हे एक मोठे आव्हान होते, परंतु ही संपूर्ण शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. रुग्णाला तिसऱ्या दिवशी घरी सोडण्यात आले आणि आता ती पूर्णपणे निरोगी जीवन जगत आहे.

 रुग्ण रेणू वर्मा म्हणाल्या की,जेव्हा मी रुग्णालयात दाखल झाली तेव्हा मला खूप वेदना होत होत्या आणि मी अन्नाचे सेवन देखील करु शकत नव्हती. डॉक्टरांनी मला सर्वकाही व्यवस्थित समजावून सांगितले आणि मला धीर दिला. शस्त्रक्रियेनंतर, मी आता पूर्णपणे बरी झाली आहे आणि मला नवीन आयुष्य मिळाले आहे. मी मेडिकव्हर हॉस्पिटलमधील संपूर्ण टीमची खूप आभारी आहे.
Comments