नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा...
"प्रवाशांच्या हिताची मागणी रेल्वे प्रशासनाकडे"

"रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय लवकरच जाहीर होईल"

पनवेल वैभव वृत्तसेवा :-       
उरण परिसरातील प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या गर्दीच्या आणि असुविधेच्या पार्श्वभूमीवर नेरुळ–उरण लोकल ट्रेन ९ डब्यांऐवजी १२ डब्यांची करण्यात यावी तसेच या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करणारे स्मरणपत्र दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांना देण्यात आले.
या अगोदरही २७ नोव्हेंबर २०२४ रोजी याच विषयावर लेखी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सदर विषयात रेल्वे प्रशासनाच्या सकारात्मक बैठका झाल्या. मात्र अद्याप त्या संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ही मागणी पुन्हा करण्यात आली आहे.

दररोज प्रवास करणारे शाळकरी विद्यार्थी, महिला आणि नोकरदार वर्ग यांना गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. वाढत्या प्रवासीसंख्येमुळे सध्या धावणाऱ्या ९ डब्यांच्या लोकल अपुऱ्या पडत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या आणि सोयीच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत तातडीची असल्याचे स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image