अमरधाम स्मशानभूमीच्या दूरवस्थेबाबत शिवसेनेचे आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन ...
अमरधाम स्मशानभूमीच्या दूरवस्थेबाबत शिवसेनेचे आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन 

पनवेल दि.२६ (वार्ताहर) : पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमीच्या दूरवस्थेबाबत शिवसेनेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन देण्यात आले असून याबाबत ठोस कारवाई न झाल्यास शिवसेना पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शिवसेना स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांनी दिला आहे.  शिवसेनेच्या वतीने अमरधाम स्मशानभूमीच्या कंत्राटदाराची सदोष व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून सविस्तर निवेदन दिले होते. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी स्वतः लक्ष घालण्याचे ठोस आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले होते. परंतू याबाबत महापालिकेच्या वतीने कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने तातडीने कारवाई करावी अन्यथा शिवसेना पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.
फोटो : अमरधाम स्मशानभूमी दूरवस्था
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image