पनवेल शहरातील रस्त्यांची पाहणी करून डागडुजी करा ; माजी नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांची पालिकेकडे मागणी...
पनवेल शहरातील रस्त्यांची पाहणी करून डागडुजी करा ; माजी नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांची पालिकेकडे मागणी


पनवेल वैभव / दि.१३ (वार्ताहर): पनवेल शहरातील रस्त्यांची पाहणी करून डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन दिले आहे..
           ऍड. मनोज भुजबळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, रेसिडन्टस् वेल्फेअर ग्रुप हा नवीन पनवेल मधील जागरुक नागरिकांची संस्था आहे. ही संस्था ही नागरीकांच्या समस्या आणि प्रशासनाकडून वेळो वेळी पुरविल्या जाणाऱ्या सुविधा यावर कार्यरत आहे. माझ्याकडे संस्थेतील पदाधिकारी प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन दिले आहे. त्यावरून नागरीकांच्या समस्या आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, नवीन पनवेल तसेच जुने पनवेल परिसरातील रस्त्यांच्या समस्या गंभीर आहेत. जवळपास सर्वच रस्ते खड्डेमय झालेले आहेत. त्यावरून चालताना किंवा दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन जाताना किरकोळ आणि गंभीर अपघात होण्याचा धोका वाढलेला आहे. रस्ते डागडुजी किंवा नविन कंत्राट काढतेवेळी उत्तम प्रतीचे मटेरीयल वापरुन कामे करून घ्यावीत, जेणेकरून प्रशासनाला व नागरीकांना त्रास होणार नाही. तसेच विनंती वजा सुचना अशी की, ज्या कंत्राटदाराला रस्त्यांचे कंत्राट मिळाले आहे त्यांचे नाव, मोबाईल नंबर हे त्या रस्त्यांच्या एका बाजुला ठळक अक्षरात प्रसिध्द करावे. निवेदनासोबत, न्यु पनवेल रेसिडन्स वेलफेअर ग्रुप यांची तक्रार माहितीस्तव व पुढील कारवाई करीता जोडली आहे.


फोटो: निवेदन
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image