नवीमुंबई विमानतळाला दिबांचेच नाव मिळणार : ना. मुरलीधर मोहोळ ...
नवीमुंबई विमानतळाला दिबांचेच नाव मिळणार : ना. मुरलीधर मोहोळ 

पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेला ना. मोहोळ यांचे ठोस आश्वासन 

प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा केंद्र सरकारकडून आदर होणार : ना.मोहोळ

पनवेल / प्रतिनिधी  -  : 
पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या वतीने विमानतळाला दिबांच्या नावासाठी आज पुणे येथे केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली असता ना. मोहोळ यांनी नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव लागणार असल्याचे ठोस आश्वासन दिले. यावेळी ना. मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासनाच्या प्रस्तावाचा आधार घेत, दि. बां.च्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा आदर केला जाणार असल्याचेही सांगितले. रविवारी पुणे येथे ना. मुरलीधर मोहोळ यांची पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता त्यांनी पत्रकारांना आश्वासित केले. 

यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. तसेच यापुढेही मुंबई मंत्रालयावरील पायी मोर्चा, दिल्ली येथे केंद्रीय नागरी व उड्डाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेऊन येत्या ८ ऑक्टोबर रोजी विमानतळाच्या उदघाटनापूर्वी विमानतळाला स्व. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव जाहीर करण्याबाबत निवेदन देण्याचेही योजले असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

सदरची भेट घडवून आणण्यासाठी म्हाडाचे मा. सभापती बाळासाहेब पाटील तसेच आमदार विक्रांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे जेष्ठ पत्रकार विजय कडू, सय्यद अकबर, विवेक पाटील, निलेश सोनावणे, रत्नाकर पाटील, संजय कदम, केवल महाडिक, राज भंडारी, प्रकाश म्हात्रे, विशाल रावसाहेब सावंत, अनिल कुरघोडे, रविंद्र गायकवाड, साबीर शेख, गौरव जहागीरदार, गणपत वारगडा, सनिप कलोते, क्षितिज कडू, शंकर वायदंडे, सुभाष वाघपंजे, राम बोरीले, सुनील वारगडा, आशिष साबळे, महिला सदस्य रुपाली शिंदे, दिपाली पारसकर, सुमेधा लिम्हाण आदींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image