विमानतळाला दि.बा.पाटील यांच्या नावासाठी सिडको आग्रही असल्याचे आश्वासन ...
अखेर पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या धरणे आंदोलनाला यश ...

आश्वासनानंतर धरणे आंदोलन स्थगित ; दक्षता विभाग मुख्य अधिकारी सुरेश मेंगडेंचे विशेष सहकार्य 

पनवेल वैभव / (सीबीडी-बेलापूर) : राज भंडारी 
पनवेल तालुक्यातील जमिनीवर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने धरणे आंदोलनाचा इशारा दिला असता, सदर आंदोलन स्थगित करावे यासाठी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार, सिडकोचे दक्षता मुख्य अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सिडकोचे विमानतळ प्राधिकरण सहव्यवस्थापक शंतनू गोयल यांच्याशी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घडवून आणत बैठकीचे आयोजन केले. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये सिडकोचे विमानतळ प्राधिकरण सहव्यवस्थापक शंतनू गोयल यांनी आयोजित बैठकीमध्ये सिडको प्रशासन हे स्व.लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रही असून आजपर्यंत विमानतळ नामकरणाचे जे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, ते फक्त आणि फक्त दिबांच्या नावाचेच असल्यामुळे स्थानिकांसह लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार आंदोलनाच्या पावित्र्यात उतरल्यामुळे सिडको प्रशासन तथा विमानतळ प्राधिकरण देखील आपल्या भावना समजून घेत दिबांच्या नावासाठी प्रयत्नशील असल्याचे आयोजित बैठकीत आश्वासित करण्यात आले. 

यावेळी सिडकोचे विमानतळ प्राधिकरण सहव्यवस्थापक शंतनू गोयल यांनी सांगितले की, पत्रकारांच्या भावना या राज्य शासनापर्यंतच नव्हे तर केंद्र शासनापर्यंत थेट पोहोचविणार असून, केंद्र शासन आपल्या भावनेची दखल घेईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. सिडकोचे दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनीही सिडकोची भूमिका स्पष्ट करून विमानतळ प्राधिकरणाची माहिती दिली. इतक्या मोठ्या संख्येने पत्रकार प्रथमच एकत्र येऊन दि.बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रही असल्याचे पाहून आपणही प्रभावित झालो असून, यापुढील भूमिका पत्रकारांनाही विश्वासात घेऊन स्पष्ट केली जाईल, असे आश्वासित केले. 

प्रारंभी पत्रकारांच्यावतीने जेष्ठ पत्रकार विजय कडू, माधव पाटील, विवेक पाटील, सय्यद अकबर, निलेश सोनावणे, संजय कदम, केवल महाडिक, राज भंडारी, प्रकाश म्हात्रे, विशाल रावसाहेब सावंत, साहिल रेळेकर, रविंद्र गायकवाड, अनिल कुरघोडे, अनिल राय, शंकर वायदंडे, आप्पासाहेब मगर, संतोष वाव्हळ, भरतकुमार कांबळे, सुनील पाटील, शैलेश चव्हाण, साबीर शेख, दिपाली पारसकर, सनीप कलोते, गौरव जहागीरदार, चंद्रकांत शिर्के, असीम शेख, अण्णासाहेब आहेर, सुनिल वारगडा , सुभाष वाघपंजे, सुधीर पाटील, तुलसीराम बोरीले, दिपक कांबळे, जितेंद्र गावडे, नवी मुंबईतील पत्रकार दिनेश पाटील आदी उपस्थित एकूण ३५ पत्रकारांनी धरणे आंदोलनाबाबत आपली भूमिका विशद केली. 
सदर धरणे आंदोलनाबाबत पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बेलापूर सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार तसेच गोपनीय पोलीस अधिकारी चेतन अहिरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image