लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मान ....
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मान 

पनवेल वैभव / प्रतिनिधी  :  - लोकनेते,माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्काराने  गौरविले जाणार आहे.

गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळ्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक,राज्याच्या मंत्री आदिती तटकरे,ज्येष्ठ संपादक मधुकर भावे,दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे,पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे आदी उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी पनवेलचे नाव उंचवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कारानेही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.वर्धापन दिनानिमित्ताने विकासाचं आंतरराष्ट्रीय शहर-पनवेल.. या विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह,मार्केटयार्ड,पनवेल येथे सायंकाळी ४.३० वाजता हा सन्मान पुरस्कार सोहळा होणार आहे.
Comments
Popular posts
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image