"पूरग्रस्त बांधवांसाठी जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे मदतीचे आवाहन"...
"पूरग्रस्त बांधवांसाठी जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे मदतीचे आवाहन"...


पनवेल / प्रतिनिधी  -  : राज्यातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी ते विद्यार्थी सर्वांवरच या आपत्तीचे गंभीर परिणाम झाले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राज्य सरकार आणि प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असले तरी सामाजिक संस्थाही या संकटाच्या काळात पुढे सरसावत आहेत.

याच पार्श्वभूमीवर पनवेलमधील भाजपा नेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या तर्फे पूरग्रस्त बांधवांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले की, “एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत एका लहान चिमुरडीने माझे शालेय साहित्य वाहून गेले, मला जगायचे आहे अशी साद व्यक्त केली. त्या चिमुरडीचे शब्द ऐकून मन हेलावले. अशा परिस्थितीत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीची आज अत्यंत गरज आहे.”

यासाठी संस्थेच्या माध्यमातून शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिली, बॅग आदी वस्तू तसेच आवश्यक जीवनोपयोगी वस्तू दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

श्री. म्हात्रे यांनी पुढे सांगितले की, “आपल्या छोट्याशा मदतीनेही एखाद्या कुटुंबाला जगण्याची नवी दिशा मिळू शकते. चिमुरड्यांचे शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.”

पूरग्रस्तांना मदतीचा हात देताना पनवेल परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन  संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

कोट
“महापुराच्या पाण्यानं शेतकऱ्याची पिकं वाहून गेली…
आशा-स्वप्नं ढगांमध्ये विरून गेली,पण तरीही शेतकरी थांबला नाही. तो पुन्हा शून्यातून नव्याने उभं राहतोय. अशावेळी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शक्यतोपरी सर्व सहकार्य करण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य लोकांनी पुढे येऊन आपले कर्तव्य बजावले पाहिजे या भावनेतून माझी जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था वस्तू स्वरूपात मदत करणारच आहे परंतु त्यासोबत अनेक दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संस्था सुद्धा यात सहभागी होत आहेत" 
श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे 
अध्यक्ष 
जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था



Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image