दि चिपळूण अर्बन को ऑप बँक पनवेल शाखेचा १४ वा वर्धापन उत्साहात साजरा...
दि चिपळूण अर्बन को ऑप बँक पनवेल शाखेचा १४ वा वर्धापन उत्साहात साजरा...
पनवेल / प्रतिनिधी  :  -
दि चिपळूण अर्बन को ऑप बँक लि चिपळूण शाखा पनवेल च्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्यनारायण पूजेला बँकेचे सन्माननीय खातेदार , सभासद आणि आपले वैश्य बांधव पनवेल तालुका वैश्य समाजाचे मा.अध्यक्ष सुनील खंडू शेट्ये ,विजय आंग्रे, उद्योजक विनायक शेट्ये, समाजातील ज्येष्ठ सन्माननीय व्यक्ती दत्तात्रय तांबोळी, सुनील भोपतराव, रमेश जगे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शाखेला सदिच्छा भेट दिली.

यावेळी बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, संचालक प्रशांत शिरगावकर, निहार गुढेकर, धनंजय खातू, समीर टाकळे, चीफ ऑफिसर नितिन नरेंद्र चिंगळे यांचे पुष्पगंधी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.

दि चिपळूण अर्बन को ऑप बँक लि चिपळूण चे मा.अध्यक्ष, संचालक मंडळ, चीफ ऑफिसर आणि पनवेल शाखा शाखाधिकारी यांचे वतीने रुपेश सुधाकर आंग्रे सर्वांचे आभार व्यक्त कले.

Comments