शिवसेना पक्षप्रमुख उ‌द्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि वह्यावाटप ...
शिवसेना पक्षप्रमुख उ‌द्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि वह्यावाटप ...


पनवेल वैभव / दि. ०१ ( वार्ताहर ) :  शिवसेना पक्षप्रमुख उ‌द्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त  आज पनवेल शहरातील  दगडी शाळा येथील शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप करण्यात आले . 
                 शिवसेना  उपनेते  बबनदादा पाटील यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप करण्यात आले . यावेळी महिला उपशहर संघटिका उज्वला गावडे यांनी शिष्यवृत्ती करीता 2500/-  रुपये रोख दिले . तसेच शहर प्रमुख प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास  महानगर प्रमुख अवचित राऊत युवा सेना जिल्हाधिकारी पराग मोहिते , विभाग प्रमुख प्रशांत नरसाळे ,विभाग प्रमुख उदय धुमाळ ,अमोल गोवरी,  निखिल भगत, कुशल भगत , राजेश शेट्टीगार,  मयुरेश पाटील , राजेश जोशी , सचिन कदम , भास्कर पाटील ,  महिला शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, उपशहर उज्वला गावडे, विभाग संघटिका अश्विनी देसाई, शाखा प्रमुख  अदिल आवशेकर आदींसह इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . 



फोटो - शालेय विद्यार्थीना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप
Comments