पनवेल जिल्हा महिला काँग्रेस आणि तेजस्विनी सखी व बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रावण सखी कार्यक्रमाचे आयोजन ...
पनवेल जिल्हा महिला काँग्रेस आणि तेजस्विनी सखी व बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रावण सखी कार्यक्रमाचे आयोजन 


पनवेल / प्रतिनिधी :-
मैत्री दिनाचे औचित्य साधून पनवेल जिल्हा महिला काँग्रेस आणि तेजस्विनी सखी व बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रावण सखी या कार्यक्रमाचे आयोजन दि.३ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
  
यावेळी महिलांच्या वक्तृत्व आणि उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या, तसेच महिला आरोग्य, महिला अत्याचार व सुरक्षा आणि महिला उद्योग यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.तसेच पवित्र श्रावण महिन्यात हळदीकुंकू या कार्यक्रमात महिलांना गृह उपयोगी वस्तू देण्यात आल्या .
  
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून महिला काँग्रेस च्या सरचिटणीस आणि पनवेल निरीक्षक चंद्रकला नायडू , कामगार नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चिटणीस श्रुति म्हात्रे, शे. का. प. च्या जेष्ठ नेत्या माधुरी ताई गोसावी , राष्ट्रवादी काँग्रेस च्या सरचिटणीस विद्या चव्हाण , पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष शशीकला सिंग, यशोदा फर्टिलीटी च्या अमृता चिखलेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
   
यावेळी पनवेल जिल्हा उपाध्यक्ष मनोज बिराजदार तसेच महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष,आणि पदाधिकारी बचत गट सदस्य व स्पर्धक उपस्थित होते. निता शेनॉय, सुदर्शना रायते, अनुपमा चुढा, सायरा कुनी, आरती ठाकूर, सोनिया सोहता, इशिका सुदीजा, अलका ठाकूर, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन निर्मला म्हात्रे (जिल्हाअध्यक्षा पनवेल महिला काँग्रेस/मा. नगरसेविका) यांनी केले होते.
Comments