रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची सेंटर ऑफ एक्सलन्सला भेट...
पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा येथील सेंटर ऑफ एक्सलन्स या आधुनिक केंद्रास संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या मान्यवर सदस्यांनी भेट दिली.
या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन अॅड. भगिरथकाका शिंदे, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सन्मानीय सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे सचिव विकास देशमुख, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार, सहसचिव (ऑडिट) डॉ. राजेंद्र मोरे, प्राचार्य डॉ. ए. सी. अत्तार, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी संस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अभ्यासक्रम के.जी. ते पी.जी. पर्यंत सुरू करण्याच्या महत्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार आज प्राथमिक शाळा ते पदव्युत्तर शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी सर्व शैक्षणिक गटांसाठी एआय विषयक पुस्तके तयार करून त्याचे पेटंट देखील मिळविण्यात आले आहे व व्यवस्थितरीत्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांत एआय कोर्सेस चालू करण्यात आले आहेत, याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यासाठी होणार असल्याचे सांगत याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता पुढील वाटचालीसाठी आधुनिक एआय सेंटर ऑफ एक्सलन्स कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सातारा येथे उभारण्यात आले असून या केंद्राचा लाभ केवळ रयत शिक्षण संस्थेतीलच नव्हे तर इतर संस्थांच्या विद्यार्थ्यांनाही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.