पनवेल शहर पोलिस पथकाची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई....
पनवेल शहर पोलिस पथकाची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई....
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने आज शहरातील लक्ष्मी वसाहत येथील अविनाश शिंदे यांच्या छताला पत्रा असलेल्या घरामध्ये धाड टाकून केलेल्या विशेष कारवाईत 8 जणांना ताब्यात घेतले आहे व त्यांच्याकडून जुगारासाठी वापरलेली रोख रक्कम हस्तगत केली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना लक्ष्मी वसाहत येथे बेकायदेशीररित्या जुगार अड्डा चालवून तेथे रोख रक्कमेचा वापर करून 13 पानी पत्ते लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.सुनील वाघ, पोउपनि. हजरत पठाण, पो.ना.रवींद्र पारधी आदींच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकून बेकायदेशीररित्या जुगार खेळणार्‍या आठ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम जुगार खेळण्यासाठी वापरलेली हस्तगत केली आहे व त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमचे कलम 4 (अ), 12 (अ) अन्वये कारवाई केली आहे. यामुळे बेकायदेशीररित्या जुगार तसेच इतर व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image