पनवेल बस आगारात दाखल झालेल्या नवीन बसेस चे"प्रितम म्हात्रेंच्या हस्ते नारळ फोडून लोकार्पण"...
पनवेल बस आगारात दाखल झालेल्या नवीन बसेस चे
"प्रितम म्हात्रेंच्या हस्ते नारळ फोडून लोकार्पण"...
   
पनवेल / प्रतिनिधी : -
महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची विकासाची घोडदौड सुरू आहे. 
      
त्याचाच एक अध्याय म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने "सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक प्रवासाकरीता पनवेलला मिळाल्या नवीन बसेस लोकांच्या सेवेसाठी वाहतुकीतली नवी पायरी प्रगतीच्या दिशेने आणखी एक पाऊल आज पडले, पनवेलला मिळाल्या अत्याधुनिक बसेस ज्यामध्ये आवश्यकता प्रवाशांसाठी सुख सोयी उपलब्ध आहेत"
         आज पनवेल एस.टी. बस स्थानक येथे नवीन बसेसचे लोकार्पण पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. नगरसेवक गणेश कडू, मा.नगरसेविका प्रीती जॉर्ज, मा.नगरसेविका सारिका भगत,परिवहन विभागीय वाहतूक अधिकारी अमित गिरमे, वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर म्हात्रे, पनवेल आगार व्यवस्थापक अश्विनी फाळके, श्री संजय पाटील आणि आजारातील विभागीय कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कोट
 सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक प्रवासा करीत पनवेल बस आगारात नवीन बसेस दाखल झाल्या. त्याचा नागरिकांना भविष्यात उपभोग घेता येईल. पनवेल बस आगार नव्याने निर्मितीसाठी काही त्रुटी निर्माण झाल्यामुळे काम थांबले आहे. संबंधित विभागाशी योग्य तो पाठपुरावा करून लवकरच प्रवाशांना आगारामध्ये मिळणाऱ्या सुख सुविधा त्यांना उपभोगता येतील यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. 

प्रितम जनार्दन म्हात्रे 
मा.विरोधी पक्षनेते 
पनवेल महानगरपालिका
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image