कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
पनवेल वैभव / दि. १३ (वार्ताहर) : कमलू पाटील यांच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त तसेच कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त सोमवार दि.१४ जुलै २०२५ रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे थाटात उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिका उपायुक्त स्वरुप खारगे, उपजिल्हा रुग्णालय पनवेल अधिक्षक अशोक गित्ते, नवी मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्त उपायुक्त डॉ.जगन्नाथ सिम्मरकर, प्रोफेसर डॉ.अमित अंबुलकर व तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि प्रवीण भगत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या निमित्ताने सकाळी ९ वाजता दिप प्रज्वलन व प्रतिमा पूजन, सकाळी १० ते १२ किर्तन- हभप श्री.लालचंद महाराज राजे व दुपारी १२ वाजता महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती निमंत्रक संस्थापक अध्यक्ष कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे बबनदादा पाटील यांनी दिली.
फोटो ः उद्घाटन सोहळा बॅनर