सराईत रिक्षा चोर गजाआड..
सराईत रिक्षा चोर गजाआड..

पनवेल वैभव / दि.29 (संजय कदम) ः पनवेल परिसरात रिक्षा चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड करून चोरीतील दोन्ही रिक्षा हस्तगत केल्या आहेत.
पनवेल शहरातील पटवर्धन हॉस्पिटल समोरील रोडवर उभी करून ठेवलेली रिक्षा तसेच अशाच प्रकारे परिसरात उभी करून ठेवलेली रिक्षा आरोपी अक्षय चव्हाण (22 रा.पनवेल) याने चोरुन तो पसार झाला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोहवा अविनाश गंथाडे, नितीन वाघमारे, महेंद्र वायकर, परेश म्हात्रे, योगेश दिवेकर, विनोद देशमुख, पोना सम्राट डाकी, पोशी चंद्रशेखर चौधरी आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना तो पनवेल परिसरात मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चोरीच्या जवळपास 1 लाख रुपये किंमतीच्या दोन रिक्षा हस्तगत केल्या आहेत. त्याच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
फोटो ः रिक्षा चोरासह पोलिसांचे पथक
Comments