आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे पनवेल मध्ये विविध आयोजन करण्यात आले, करंजाडे पनवेल येथील त्रिधाम मंदिरात भव्य चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला,करंजाडेत पहिल्यांदा एवढी भव्य चित्रकला स्पर्धा दमदार आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्रिधाम मंदिर करंजाडे येथे रविवारी 13,जुलै रोजी अतिशय सुरेख, उत्कृष्ट चित्रकला स्पर्धा सकाळी संपन्न झाली.
यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
करंजाडेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना गुणांना वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेतील विषय चंद्रयान/पृथ्वीचे संवर्धन, अयोध्या मंदिर, पंढरीची वारी, विश्वगुरु भारत, मिशन सिंदूर हे होते. यावेळी विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 108 दिवे लावून महिलांनी शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त "सन्मान मातृशक्तीचा" सन्मानचिन्ह देऊन करंजाडेतील अंगणवाडी सेविका यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत करणारे युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांचे आमदार विक्रांतदादा पाटील यांनी कौतुक केले.
वाढदिवसानिमित्त आमदार विक्रांतदादा पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व जनतेला मार्गदर्शन करत या पुढेही जनतेची कामे करत राहू असे आश्वासन त्यांनी दिले.