महामार्गावरील उभ्या ट्रेलर मधून किमती ऐवज चोरणाऱ्या चौकडीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड ...
पनवेल वैभव / दि. २१ ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील पनवेल ते शेडुंग जाणाऱ्या ओव्हरब्रीज जवळ लघवी करता थांबलेल्या ट्रेलर चालकाच्या ट्रेलर मधून मोबाईल , रोख रक्कम व इतर कागदपत्रे चोरणाऱ्या चॊकडीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे .
याबाबतची तक्रार ट्रेलर चालक विनोद बिंद याने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करताच वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोनि गिजे ,पो. उपनिरीक्षक राजपूत ,पोहवा धुमाळ ,तांडेल ,म्हारसे ,देवरे ,कुदळे ,बाबर ,पो. शि खताळ ,भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार द्वारा अधिक माहिती घेतली असता सराईत गुन्हेगार अविनाश धारपवार (वय २२) रा. वनवेवाडी याची माहिती मिळाली त्यानुसार त्याच्यासह त्याचे सहकारी राजकुमार वाघचौरे ( वय २६ ) रा. पोयंजेवाडी, दीपक वर्मा (वय २५ ) रा. बारापाडा व अनिकेत नाईक (वय २३) रा. बारापाडा या चॊकडीला ताब्यात घेतले असता त्यांच्या कडून गुन्ह्यातील मुद्देमालासह दोन दुचाकी व १५ मोबाईल फोन असा मोठा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे . या चॊकडीच्या अटकेमुळे अजूनही काही चोरी व लुटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे .
फोटो - आरोपीसह पनवेल तालुका पोलिसांचे पथक