मैथिलीच्या कुटुंबियांना प्रितम म्हात्रे यांचा आधार ; भावंडांचा शैक्षणिक भार उचलून केले सहकार्य...
मैथिलीच्या कुटुंबियांना प्रितम म्हात्रे यांचा आधार!
भावंडांचा शैक्षणिक भार उचलून केले सहकार्य


पनवेल : अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात  कु.मैथिली मोरेश्वर पाटील हीचे निधन झाले होते. मैथिलीच्या कुटुंबीयांना भाजपनेते मा. विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी आधार देत त्यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने तिच्या भावंडांचा शैक्षणिक भार उचलून त्यांना सहकार्य केले.
          काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात न्हावे येथील मैथिली पाटील हिचे  निधन झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तिच्या कुटुंबीयांनी तिचे शिक्षण पूर्ण केले होते.मात्र विमान अपघातात तिचा मृत्यू झाला. तिच्या निधनानंतर तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून तिच्या भावंडांची पूर्ण वर्षाची शैक्षणिक फी संस्थेच्या वतीने भरण्यात आली.

कोट
पाटील कुटुंबियांवर ओढवलेल्या प्रसंगात आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. सध्या त्यांना त्वरित आवश्यक असलेली मदत आम्ही आमच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून केलेली आहे.विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांना मिळणाऱ्या मदतीसाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य आम्ही यापुढेही करणार आहोत.-
प्रितम जनार्दन म्हात्रे, 
अध्यक्ष, 
जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था.
Comments