कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांचे मोबाईल हिसकावून पसार झालेले दोन आरोपी गजाआड
पनवेल वैभव / दि. २८ ( संजय कदम ) : पनवेल वाहतूक शाखा येथे नेमणूक असलेले पोहवा युवराज येळे व पोहवा अमीर रसूल मुलाणी यांचा मोबाईल डिझेल चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनी हिसकावून ते पसार झाले होते . याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपीना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे त्याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
पुष्पक नगर समोरील ब्रिजवर, पनवेलच्या दिशेने येणाऱ्या वाहिनीवर, जे.एन.पी.टी. रोडवर, कर्तव्य बजावत असताना पोहवा युवराज येळे व पोहवा अमीर स्सुल मुलाणी हे जे.एन.पी.टी. रोडवर दोन्ही बाजुला अनधिकृतपणे उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करित असताना यातील आरोपींपैकी एक आरोपी उभा असलेला मिक्सर वाहन क्र. एम एच ०४ एफ बी २३३१ या वाहनातून डिझेल काढत असताना त्यांनी पाहिल्यानंतर त्यास हटकले असता नमुद आरोपी पळून जावुन मिक्सर वाहन शेजारीच उभी असलेली पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये बसत असताना यातील या दोघांनी त्यास पकडले असता त्याने या दोघांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करुन त्या दोघांना धक्का देवुन खाली पाडुन त्याच्या ताब्यातील मोबाईल त्यांच्या संमतीशिवाय हातातून हिसकावुन जबरी चोरी करुन नमुद पांढऱ्या रंगाच्या कारच्या चालक सिटवर बसलेला सह आरोपी सोबत पळुन गेले होते .
या बाबतचा तपास वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे , पोहवा अविनाश गंथाडे , नितीन वाघमारे , महेंद्र वायकर ,परेश म्हात्रे , योगेश दिवेकर,विनोद देशमुख ,पोना सम्राट डाकी ,पोशी चंद्रशेखर चौधरी आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना पोहवा परेश म्हात्रे याना आरोपी साहिल लाड (वय २३ ) रा. कर्जत यांच्या बाबत माहिती मिळली असता आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने त्याचा सहकारी मुक्शशीर मुसव्वीर टोले, (वय २७) वर्षे रा. घाटकोपर याची माहिती दिली . या दोघांनी गुन्हा कबुल केला असून मुख्य सहकारी जय पंडित याचा शोध पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे करीत आहेत .
फोटो - पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे व पोहवा परेश म्हात्रे