लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पनवेल ( प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, खारघर मंडळाच्या वतीने माननीय लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचे ७५ व्या वर्षात पदार्पण अर्थात अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवसनिमित्त रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

रायगड जिल्ह्यात सध्या जाणवणाऱ्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, खारघर परिसरातील नागरिकांना स्वयंप्रेरणेने रक्तदानाचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिरास पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष भेट देत, खारघर युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच युवा व महिला पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करत, समाजसेवेत त्यांचा सहभाग प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही उपस्थित राहून, “मानवतेसाठी व समाजाच्या ऋणातून प्रेरित झालेलं रक्तदान हे अत्यंत पवित्र व निःस्वार्थ सेवा कार्य आहे,” असे उद्गार काढले.

दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त, आज मला माझं ७५वं रक्तदान करण्याचं भाग्य लाभलं, ही बाब माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक आहे,” असे खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीनभाई पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील,  अजय बहिरा, गुरुनाथ गायकर, नगरसेविका नेत्रा किरण पाटील, जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, पनवेल उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, 
महिला अध्यक्षा साधना पवार, जिल्हा युवा अध्यक्ष मयुरेश नेतकर, खारघर युवा अध्यक्ष नितेश पाटील, सरचिटणीस अक्षय लोखंडे, प्रविण रामजी बेरा, युवा अध्यक्ष आशिष कडू, अक्षय सिंग, समीर कदम, वासुदेव पाटील, अमर उपाध्याय, विजय पाटील, संतोष शर्मा, अक्षय सिंग, डॉ. विजय उजलंबे,आदित्य हातगे, योगेश पाटील, मयूर घरत, कोमल शिंदे, दुर्गा बन्सल,अभिजीत देहाडे, सुमित देहाडे, प्रथम पाटील, सार्थक दोरुगडे, दिनेश यादव, अंकुर शर्मा, राहुल शिंदे, ध्रुव गजरा, अमित बोढई, स्नेहल बोढई, वैभव शेजवळ, संदीप माघाडे, शोभा मिश्रा, निर्मला यादव,कुणाल देवकर, मधुमिता जेना
व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चा, महिला मोर्चा व विविध विभागांतील स्वयंसेवकांनी अथक मेहनत घेतली. हा उपक्रम समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी अधोरेखित करणारा ठरला.
Comments