शिवसेनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना ५०० वह्यांचे वाटप ....
पनवेल वैभव / दि. १४ ( वार्ताहर ) : प्रभाग क्र.१७ मध्ये शिवाजीनगर झोपडपट्टी पनवेल या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून तसेच माजी नगरसेवक शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर व माजी नगरसेवक पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या प्रयत्नाने पनवेल शहर प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान व उपविभाग प्रमुख गुलाब बागवान यांच्या माध्यमातून वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रायगड जिल्हा सल्लागार प्रमुख मा.नगरसेवक रमेश गुडेकर आणि पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनवणे उपस्थित होते प्रभाग क्र.१७ चे शाखा प्रमुख अनिकेत जेसवाल शिवसैनिक रसूल बागवान, शैलेश शिंदे, उरली गावचे शाखा प्रमुख विवेक घाणेकर, दीपक प्रभू, सिद्धेश पवार, राहुल शिंदे, अविनाश डोकडे, रोशन पवार, ईशान बागवान, योगेश शिंदे, अभि पवार शिवसेना पदाधिकारी व विद्यार्थी पालक वर्ग यावेळी उपस्थित होते.
फोटो - जिल्हा सल्लागारप्रमुख रमेश गुडेकर वह्या वाटप करतांना