भर बाजारात मध्यरात्री दोन दुकानांना आग ; जागरूक नागरिकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली...
भर बाजारात मध्यरात्री दोन दुकानांना आग ; जागरूक नागरिकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली...


पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : पनवेलमधील भर बाजारात मध्यरात्री दोन दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. एका जागरूक नागरिकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
                    पनवेल शहरातील मुख्य बाजारपेठेत मोतीराम स्नॅक्स जवळ असलेल्या सलून आणि फुलाच्या दुकानातून अचानक काही जळत असल्याचा वास येवू लागला.तेव्हा सोनू राजभर या जागरूक नागरिकाने गोंगाट घालून अग्निशमन दलास पाचारण केले.अग्निशमन दल देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले.पण तोपर्यंत दोन दुकाने आगीच्या भक्षस्थानी गेली होती.अग्निशमन दलाने अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी दोन अग्निशमन बंब लागले. यावेळी तेथील आजूबाजूचे दुकानदार,सुरक्षा मंडळाचे कर्मचारी, विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी आदी उपस्थित होते.  


फोटो - दुकानाला लागलेली आग
Comments