स्थूलपणा भारतातील शहरी आणि निम-शहरी भागांमध्ये वाढत असलेली एक साथ आहे
अपोलो नवी मुंबईत सुरु होणार 'इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल ओबेसिटी अँड मेटाबोलिजम'
नवी मुंबई (पनवेल वैभव) १३ जून २०२५ - अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे १४ जूनला एका अत्याधुनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल ओबेसिटी अँड मेटाबोलिजमचे उदघाटन केले जाणार आहे. या भागामध्ये स्थूलपणाचे वाढते संकट दूर करणे हा या क्लिनिकचा उद्देश आहे. हे क्लिनिक वजन व्यवस्थापनासाठी एक मल्टी-डिसिप्लिनरी दृष्टिकोन प्रदान करेल, ज्यामध्ये लोकांच्या आवश्यकतांनुसार मेडिकल, पोषण आणि मनोवैज्ञानिक मदत यांची सांगड घातली जाईल.
भारत एका मोठ्या गंभीर सार्वजनिक आरोग्य संकटाचा सामना करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, स्थूलपणा हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. हृदयाचे आजार, टाईप २ मधुमेह आणि काही कॅन्सर स्थूलपणामुळे होतात. हे आजार सिस्टिमिक इन्फ्लेमेशनशी संबंधित असतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या आणि अवयवांचे नुकसान होते, अनेक गंभीर, गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणावर उपाय करणे हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीच नव्हे तर प्राणघातक आजारांना आळा घालण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे.
मुलांमध्ये स्थूलपणा वाढत आहे, ही अजूनच चिंताजनक बाब आहे. लॅसेन्टच्या एका अभ्यासानुसार, भारतामध्ये ५ ते १९ वर्षे वयाची जवळपास १२.५ मिलियन मुले २०२२ मध्ये स्थूलपणाने ग्रस्त होती. ही आकडेवारी जगात सर्वात जास्त आहे आणि १९९० पासून ०.४ मिलियनपासून यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, साखर मिसळलेली पेये यांचा वाढता खप, स्क्रीनवर खूप जास्त वेळ घालवणे आणि शारीरिक हालचाली खूपच कमी करणे ही या समस्येची प्रमुख कारणे आहेत.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये इन्स्टिटयूट ऑफ क्लिनिकल ओबेसिटी अँड मेटाबॉलिजम स्थूलपणाची प्रमुख कारणे दूर करणारी सर्वसमावेशक देखभाल प्रदान करून या संकटांचा सामना करू इच्छिते. वैयक्तिक उपचार योजना आणि जीवनशैलीमध्ये सस्टेनेबल परिवर्तनावर ध्यान केंद्रित करून, स्थूलपणाने ग्रस्त व्यक्ती, खास करून मुले आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्य व कल्याण यामध्ये सुधारणा घडवून आणणे हा या क्लिनिकचा उद्देश आहे.
डॉ संजय खरे, चीफ कन्सल्टन्ट-बॅरियाट्रिक मेडिसिनचे डायरेक्टर, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,"संपूर्ण देशात जी परिस्थिती आहे तीच आम्ही रोजच्या रोज अनुभवत आहोत. भारत वेगाने स्थूलपणाची ग्लोबल कॅपिटल बनत आहे आणि खासकरून मुलांमध्ये स्थूलपणा खूप जास्त वाढत आहे. हे फक्त वजनाच्या बाबतीत नाही तर स्थूलपणा अनेक गंभीर समस्या जसे की, खूपच कमी वयात मधुमेह होणे, हार्मोनल असंतुलन आणि हृदयसंबंधी धोक्याचे मूळ कारण आहे. आमच्या क्लिनिकसोबत आम्ही एक विज्ञान-संचालित, समुदायावर आधारित उपक्रम सुरु करत आहोत, ज्यामध्ये शाळा, समाज आणि परिवारांच्या माध्यमातून लवकरात लवकर निदान, वैयक्तिक सल्ला आणि जीवनशैलीमध्ये दीर्घकालीन परिवर्तनाला प्राधान्य दिले जाते."
श्री अरुणेश पुनेथा, वेस्टर्न रीजनचे रीजनल सीईओ, अपोलो हॉस्पिटल्स यांनी सांगितले,"हे क्लिनिक सुरु करून अपोलो प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेप्रती आपली वचनबद्धता मजबूत करत आहे. डॉक्टर्स, आहार तज्ञ, मनोवैज्ञानिक, फिजिओथेरपिस्ट आणि वेलनेस विशेषज्ञ यांनी सुसज्ज मल्टी-डिसिप्लिनरी टीम त्या व्यक्तींसाठी एक अनुकूल योजना प्रदान करते जे त्यांना निरोगी जीवनशैलीच्या दिशेने सुरु असलेल्या प्रवासासाठी प्रोत्साहित करते. आम्ही फक्त स्थूलपणावर उपचार करत नाही तर मुलांपासून सुरु करून अगदी शेवटच्या स्तरावर जागरूकता, निदान आणि शिक्षणाला प्रोत्साहन देऊन सामुदायिक आरोग्याला प्रोत्साहन देत आहोत."