कोकण म्हाडा मा.सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ''न्यू होम मिनिस्टर'' रंगला खेळ पैठणीचा...
पनवेल वैभव, दि.9 (वार्ताहर) ः कोकण म्हाडाचे मा. सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, महिला सक्षमीकरण, मनोरंजन आणि सन्मान यांचा सुंदर संगम ठरणारा ‘न्यू होम मिनिस्टर’ हा विशेष कार्यक्रम पार खारघर येथे पार पडला आहे.
घर आणि समाज या दोन्ही आघाड्यांवर आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार्या मातृशक्तीच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गृहिणींना त्यांची नेतृत्वक्षमता, संवादकौशल्य आणि विनोदबुद्धी दाखवण्याची संधी मिळाली. यावेळी विशेष उपस्थितीत म्हणून सुप्रसिद्ध सिने-अभिनेत्री सौ.शिवानी सुर्वे (‘देवयानी’, ‘फुलवा’ मालिका आणि ‘ट्रिपल सीट’ चित्रपट फेम), सुप्रसिद्ध सिने-अभिनेत्री सौ.मेघा धाडे (2018: बिग बॉस मराठी विजेती), सुप्रसिद्ध सिने-अभिनेता - क्रांती नाना माळेगावकर (न्यू होम मिनिस्ट्रर खेळ पैठणीचा) तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आ.विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस श्रीमती.माधवीताई नाईक, रायगड भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, मा.नगरसेवक सौ.नेत्रा पाटील, ब्रिजेश पटेल, सौ.साधना पवार, संयोजक नगरसेवक समीर कदम मित्र परिवार, उदय पाटील मित्र परिवार, विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महिला वर्गाच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि सकारात्मक प्रतिसादाने कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा संचारली. महिला भगिनींनी ज्या उत्साहाने विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला, आपली कला, नेतृत्व आणि संवादकौशल्य दाखवले, ते खरंच प्रेरणादायी ठरले, असल्याचे मत आ.विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले.
फोटो ः पैठणीचा खेळ