कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या शिरेपेचात मनाचा तुरा ; बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजला नॅक चे बी+ मानांकन प्रदान....
पनवेल वैभव / दि.२१(वार्ताहर): तळोजा येथील कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजला नॅक चे बी+ मानांकन मिळाले असून त्यांच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजला नॅक चे बी+ मानांकन नुकताच प्रदान करण्यात आला आहे. या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पीअर टीमने भेट दिली होती. या मूल्यमापनामध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदने कॉलेजला २.५२ सी.जी.पी.ए. सह ‘बी+’ हे मानांकन प्रदान करण्यात आले आहे. या अभुतपूर्व यशाने कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या देदीप्यमान यशाबद्दल कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांनी सर्व मान्यवर पदाधिकारी, व्यवस्थापक मंडळ, मुख्यध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व तसेच विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांचे कौतुक केले आहे.
फोटो: बबनदादा पाटील