पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी विजय तायडे यांची नियुक्ती...
पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी विजय तायडे यांची नियुक्ती

पनवेल वैभव, दि.6 (संजय कदम) ः पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी विजय तायडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
यापूर्वी वपोनि पदी संजय चव्हाण हे कारभार पाहत होते. परंतु त्यांची बदली मुंबई येथे होवून त्यांच्या जागी मुंबई येथे कार्यरत असणारे विजय तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी विजय तायडे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचा सुद्धा कारभार पाहिला असल्याने त्यांना पनवेल रेल्वे परिसरातील अधिक माहिती आहे. त्यामुळे या माहितीचा फायदा या भागातील गुन्हेगारी रोखण्यास त्यांना होणार आहे.
Comments